आजच्या वेबसीरिजच्या जमान्यात सर्वत्र लोकप्रिय असणाऱ्या एसआयटी म्हणजेच 'शिट्टी आइडिया ट्रेन्डिंग' या युट्युब चॅनलने युट्युब वर १ मिलियन तर फेसबुक वर ४ मिलियन फॉलोअर्सचा उच्चांक गाठून मोहित हुसेन आणि छवी मित्तल या एसआयटीच्या संस्थापकांनी हिंदी तसेच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांसमवेत आपल्या यशस्वी वाटचालीचा आनंद साजरा केला. शरद आणि किर्ती केळकर, गौरव गेरा, अयूब खान, करण व्ही. ग्रोव्हर, पूजा गोर, राजसिंग अरोरा, किश्वर मर्चंट, प्रचीन चौहान, मानसी पारेख, व्रजेश हिरजी, मानसी रच, जयती भाटिया, शुभांगी लिटोरिया, विनोद सिंह, अनुज सचदेव, शक्ति आनंद यांसारख्या अनेक तारकांनी पार्टीस रंगात आणली. प्रसंगी मोहित आणि छवी यांनी 'द फॅमिली वेकेशन' या एसआयटीच्या आगामी नवीन वेब सिरीजची घोषणा देखील केली.


No comments:
Post a Comment