असे क्वचितच घडते जेव्हा तिरंग्यामध्ये इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांची झलक दिसते. पण जेव्हा असे घडते विश्वास करा तेव्हा यापेक्षा उत्तम दृश्य काहीच असू शकत नाही. जेव्हा तिरंगा अभिमानाने लहरतो तेव्हा तो उच्च कोटींच्या प्रतिभांना मानवंदना देतोय असे प्रतीत होते.
आपण ज्या प्रतिभावान डिझाइनरबद्दल बोलत आहोत त्यांचे नाव आहे रोहित वर्मा, जे ऑगस्ट महिन्यात अटलांटा येथे होणाऱ्या इंडिया डे परेड मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.
रोहित वर्मा हे त्यांच्या विशिष्ट भारतीय परिधानाच्या डिझाइनसाठी ओळखले जातात. ते अटलांटा मधील आयएसीए इंडियन फेस्टिव्हल येथे त्यांच्या उत्कृष्ट संकलनाचे प्रदर्शन करणार आहेत.
आपला आनंद व्यक्त करताना ते म्हणाले, "आयसीए महोत्सवाच्या निमित्ताने मी भारतीय संस्कृती आणि कलेचे प्रतिनिधित्व करताना अटलांटा येथे माझा भारतीय ध्वज नेणे याचा मला अतिशय आनंद होत आहे.
कमलेशजींचे आणि आयएसीएच्या संपूर्ण टीमचे विशेष आभार मानतो, त्यांनी मला आमंत्रित केले."
रोहित वर्मा त्यांच्या डिजाइन संकलनाबद्दल म्हणाले, "या प्रदर्शनासाठी मी हाताने विणलेल्या खादी आणि कॉटनसारख्या कपड्यांचा समावेश केला आहे जे भारताचे खरे सार मानले जातात. हे संकलन भारतासाठी माझ्या भावना व्यक्त करेल. इंडिया डे च्या परेडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे हा एक मोठा सन्मान आहे. तो मला मिळाला यापेक्षा मोठ्या अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट कोणतीच नाही माझ्यासाठी. जय हिंद! ”"
No comments:
Post a Comment