Saturday, 20 July 2019

ट्रिपल तलाक वर आधारित 'हलाला' ही Ullu Appची नवीन पेशकश!


लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Ullu आता तुम्हाला ट्रीपल तलाकवर आधारित एक नवीन मालिका 'हलाला'चे प्रदर्शन दर्शविण्यास सज्ज झाले आहे. 'हलाला' ही कथा मुस्लिम समाजातील तीन घटस्फोटानंतर घटस्फोटीत महिलांच्या परिस्थितीवर भाष्य करणारी एक भावनात्मक मालिका आहे. हलाला Ullu सर्वेसर्वा आणि निर्माते, चित्रपट निर्माते, उद्योजक विभू अग्रवाल यांचे प्रदर्शन आहे. फाल्गुनी शाहच्या ड्रीम इमेजच्या मदतीने ही मालिका तयार करण्यात आलेले असून दिपक पांडे यांनी याचे दिग्दर्शन केलेले आहे.  

इश्क सुभान अल्लाह ही सर्वांत लोकप्रिय मालिका व त्यानंतर त्यातील अभिनेत्री सह 'कोड ब्लू' या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेल्या चित्रपटामुळे  देशभरातील मुस्लिम स्त्रियांच्या दुःखांवर प्रकाश टाकला आहे. 'हलाला' मालिकेतून आशियाभर तसेच मुस्लिम वर्चस्व असलेल्या क्षेत्रासह मुस्लिम महिलेला देण्यात आलेल्या ट्रिपल तालकनंतर उद्भवलेल्या समस्या दर्शविल्या आहेत.  तीन वेळा तालकची घोषणा झाल्यानंतर, स्त्रीला हराम ठरविले जाते. त्यानंतर ती कोणत्याही अन्य व्यक्तीशी लग्न करून त्यास आपला  तिचा पती बनवू शकत नाही. आणि इतकेच नव्हे तर, जर का घटस्फोटित मुस्लिम स्त्रीस पुन्हा पहिल्या पतीबरोबर राहायचे असेल तर त्या महिलेला दुसरे लग्न करून त्या पुरुषाशी शारीरिक संबंध साधावे लागतात.

ही कथा एक जोडप्याच्या जवळपास फिरते, एका निर्भीड महिलेचा प्रवास आणि तिची समाजाशी सुरू असलेली लढाई म्हणजे 'हलाला'. ह्या कथेसाठी कास्टिंग करणे ही एक क्लिष्ट प्रक्रिया होती.  ज्यामध्ये ज्येष्ठ अनुभवी आणि तरुण प्रतिभावंत व्यासपीठावर त्यांची अभिनय कौशल्ये दाखवण्यासाठी बरोबरीने खांद्यास खांदा लावून सज्ज आहेत.  Ullu Appच्या 'हलाला' ह्या नवीन शो मध्ये 'दिया और बाती हम' मालिकेतील प्रसिद्धी अभिनेत्री दीपिका सिंग, 'जोधा अकबर' चित्रपटातील रवी भाटिया, 'चिडिया घर' या प्रसिद्ध कॉमेडी मालिकेतील शफ़ाक नाज़, 'मोह मोह के धागे' फेम एजाज़ खान  अशी तगडी स्टार कास्ट आहे. इतकेच न्हवे तर उल्लूच्या या हलालामध्ये लोकप्रिय आणि प्रतिभाशाली अभिनेत्री-नृत्यांगना नीलिमा अज़ीम देखील आहेत त्या या मालिकेमध्ये आईच्या भूमिकेत तर रवी आणि एजाज़ यामध्ये त्यांच्या पतीच्या भूमिका पार पडताना दिसून येतील. शफ़ाक या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत तर  दीपिका  मालिकेत एका वकीलच्या भूमिकेत दिसून येईल.

Ullu App चे एका वर्षासाठी ३६ रू नाममात्र सदस्यता शुल्क आहे तसेच आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या वेब-मालिका, चित्रपट आणि विशेष Ullu शो पाहण्याची संधी सुद्धा मिळणार आहे. ह्या डिजिटल मंचावर  प्रेक्षकांसाठी नाटक, भयपट, रहस्यमय, थ्रिलर किंवा विनोदी अशाप्रकारे विविध सिरीज पाहण्यास मिळणार आहे. Ullu App मध्ये ओरिजनल आणि सिंडिकेटेड सामग्रीची एक मोठी लायब्ररी आहे, ज्यामध्ये ओरिजनल मालिका, लघुपट आणि डॉक्यूमेंटरी चित्रपट, बहुभाषिक सामग्री, गाणी, ऑडिओ सूची इ. चा समावेश आहे. हे app वापरकर्त्यांना विडियो डाउनलोड करून इंटरनेट शिवाय पाहण्याची सुविधा देते. Ullu हे अप्लिकेशन आता iOS वर अप्पल वापरकर्त्यांसाठी आणि Google Play Store वर Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment