Monday, 9 September 2019

पाइपिंग हॉट रेस्टोबार मध्ये सुपरस्टार गोविंदा, अभिनेत्री टीना आहूजा, संगीतकार गजेंद्र वर्मा आणि निर्माता हितेंद्र कपोपारा यांनी 'मिलो ना तुम' संदर्भात साधला पत्रकारांशी संवाद



ब्रँड-न्यू मल्टी स्पेशालिटी रेस्टोबार बार पाईपिंग हॉट येथे अभिनेत्री टीना आहूजा, गायक-संगीतकार गजेंद्र वर्मा आणि निर्माता हितेंद्र कपोपारा यांच्यासह  बॉलीवूड चे हिरो नं. १ असलेले लाडके अभिनेता गोविंदा, संगीत दिग्दर्शक अमन प्रजापत आणि इतर कलाकार व क्रु यांच्यासह 'मिलो ना तुम' या एव्हरग्रीन गाण्याच्या नवनिर्मिती संदर्भात पत्रकारांशी सवांद साधला. ह्या गाण्यात सुपरस्टार गोविंदा ह्यांची मुलगी टीना आहूजा एका मोहक अंदाजात गजेंद्र वर्माबरोबर दिसून येणार आहे. ह्या विलक्षण प्रसंगी उपस्थित पाहुणे आणि पत्रकार स्वादिष्ट पदार्थ आणि पेय ह्यांचा आनंद घेत असताना दिसून आले.

आजकाल गाण्यांच्या रीमेकचा ट्रेंड खूप वाढला आहे. डायमंड ज्युबिली हिट चित्रपट 'हीर रांझा' मधील गाण्याचे नावही त्यात जोडले गेले आहे. हितेंद्र कपोपारा निर्मित ‘मिलो ना तुम’  ह्या गाण्याला रिकम्पोज करून गजेंद्र वर्मा यांनी आपल्या सुरमधुर आवाजात संगीतबद्ध केलेले आहे. ख्यातनाम संगीत व्हिडिओ दिग्दर्शक अमन प्रजापत यांनी सौदी अरेबियामधील सुंदर लोकेशन्सवर 'मिलो ना तुम' व्हिडिओ शॉटचे दिग्दर्शन केले आहे. ‘मिलो ना तुम’ हा कलाकार आणि क्रूसाठी एक प्रबोधन करणारा अनुभव होता!

आपल्या मुलीचे समर्थन करण्यासाठी शूटच्या ठिकाणी वैयक्तिकरित्या गोविंदा तेथे उपस्थित होते, अभिमानी वडील गोविंदा म्हणाले की, "माझ्या मुलीचे शूटिंग इतके छानपणे पार पडले आहे आणि मी भाग्यवान आहे, ह्या सर्व क्रियेचा मला साक्षीदार होता आले ! तिने आणि संपूर्ण टीम ने बरीच मेहनत घेतली आहे ज्याचा परिणाम आपल्याला दिसतोय."

जेव्हा संगीतकार स्वत: ऑन-लूप असतो तेव्हा ते चांगले झालेच पाहिजे! गजेंद्र वर्मा यांनी सांगितले की, “मी माझ्या स्वत: च्या ट्रॅकवर प्रेम करतो, मी या सुंदर रचनेच्या प्रवासात विलीन आहे आणि टीना सारख्या प्रतिभावान अभिनेत्री बरोबर शूट करणे हे स्वप्नापेक्षा कमी नव्हते.”


“वाळवंटात शूटिंग करणे इतके सोपे काम नाही, परंतु जेव्हा आपण विविध देशांमधील लोक  तुमच्या ट्रॅकवर थिरकताना - गुणगुणताना दिसतात तेव्हा आपल्याला याबद्दल सकारात्मक भावना जाणवायला लागतात.” आनंदित टीना अहूजा म्हणाल्या.

विलेपार्ले येथे स्थित, पाइपिंग हॉट रेस्टो बार स्थानासाठी एक उल्लेखनीय निवड होती, कारण या ठिकाणी आपल्या शहरासाठी प्रसिद्ध असलेली डिश पुन्हा नवीन पद्धतीने तयार करून आपल्या विस्तृत मेनूमध्ये समाविष्ट केली आहे. जरी आपण भारतीय, पॅन एशियन किंवा कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांमधून निवडता तरी आणि अगदी खऱ्या खवय्या मुंबईकरांप्रमाणे पाव भाजी फोंड्यू, वाव-वाव वडा पाव फोंड्यू किंवा मांसाहारीचा आनंद खिमा पाव फोंड्यू ! ह्यांसारख्या विशिष्ट पदार्थांनी लक्ष वेधले आहे.

स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि उत्सव दरम्यान,  हितेंद्र कपोपारा शेवटी म्हणाले, ! “गाण्याला वेगळ्या दृष्टीकोनातून देण्याची कल्पना, ऑडिओ सुपरहिट आहे, मला व्हिडिओ देखील तितकाच चांगला दिसावा अशी इच्छा होती, म्हणून मी दुबईचे लोकेशन निवडले. गजेंद्र हा रॉकस्टार आहे आणि टीना ही ऊर्जेचा स्फोट आहे. आजच्या तारखेमध्ये रीमेक चालू आहेत आणि त्याचा प्रभाव अतुलनीय आहे. ”

No comments:

Post a Comment