यानिमित्त गोविंदा म्हणाले की, “टीना खेरीज मी गायक-संगीतकार गजेंद्र वर्मा, दिग्दर्शक अमन प्रजापत आणि निर्माता हितेंद्र कपोपारा यांना पूर्वीपासून ओळखतो. मला माहित होते की हा प्रकल्प नक्की चांगला होईल. पण, मी कबूल करतो की जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तेव्हा मी भारावून गेलो. आज टेलीव्हिजनवर तुम्हाला दिसणाऱ्या इतर अल्बमपेक्षा 'मिलो ना तुम' अगदी भिन्न आहे. आजकालचे बहुतेक अल्बम इतके समान असतात की ते एकाच कुटुंबातील आहेत असे वाटू शकते. मिलो ना तुम एक सदाबहार गीत अविस्मर्णीय लिरिक्स बरोबर एक निश्चित शॉट चार्टबस्टर आहे. हा व्हिडिओ आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. परफॉर्मन्स चांगले आहेत आणि गाणे व त्याची रचना आपल्यावर जादू करते. हितेंद्र कपोपारा यांनी अर्थसंकल्पात कुठेही तडजोड केलेली दिसत नाही. त्यांनी प्रोजेक्ट खूप चांगला केला आहे. स्टाईलिंग देखील सहजतेने सुंदर आहे हे सिद्ध होते. टीना खूपच सुंदर दिसत आहे आणि तिने अतिशय चांगला परफॉर्मन्स दिला आहे आणि हे मी वडिल ह्या नात्याने नाही बोलत आहे. ”
ज्ञात सत्य म्हणजे गोविंदा तीन दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यांनी ह्या चित्रपटसुष्ट्रीतील अनेक दिगज्ज व्यक्तीबरोबर काम केले आहे. या सर्व अनुभवांनी त्यांना त्यांच्या कारकीर्दीत मदत केली आहे. "मी केवळ दर्जेदार प्रकल्पांमध्ये स्वत: ला सामील करतो." असे म्हणत सुपरस्टार "मिलो ना तुम" च्या यशाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
No comments:
Post a Comment