कुणाल रॉय कपूर म्हणतात की, “माझे कुटुंब माझ्यासाठी नेहमीच सहाय्यक होते परंतु ते चांगले समीक्षक देखील आहेत. पण मला आनंद आहे की आम्ही एकत्र हा चित्रपट पाहिला आणि त्यांना तो आवडला! ज्या लोकांना भयपट आवडतात त्यांनी नक्कीच मुश्किल पाहायला हवा.”
कुणालची आई सलोम त्यांना शेवट फारचं आवडला असल्याचे व्यक्त केले तर, त्याची पत्नी शायंती यांना कुणालचा रोमँटिक अंदाज आवडलेला असून “मी खरंतर भयपट प्रकारामुळे घाबरले पण मला चित्रपटाची कथा खूप आवडली.” असल्याचे सांगितले.
प्रीमियर प्रसंगी कुणाल यांच्या आई-वडील, पत्नी व भावांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद आणि अभिमान पाहण्यास मिळाला. आपला लहान भाऊ आदित्य रॉय कपूर निपुण असलेल्या रोमँटिक भूमिका साकारण्याच्या प्रांतात प्रवेश ठरणारा 'मुश्किल-फियर बिहाईंड यु' हा प्रथमच चित्रपट आहे. त्यांची व्यस्त दिनचर्या विचारात घेतल्यास, कदाचित त्या तीन भावांना एकत्र भेटविणे ‘मुश्किल’ असेल असे एखाद्याला वाटेल, पण प्रेमामुळे काहीही शक्य होते!
No comments:
Post a Comment