मध्यप्रदेशातील इंदौर येथे २०१९ च्या नॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड्स सोहळ्यात बहुचर्चित चित्रपट निर्माती, मीडिया स्ट्रॅटेजीस्ट, ऍनिमल ऍक्टिविस्ट, पत्रकार आणि टेडेक्स वक्ता अनुशा श्रीनिवासन अय्यर यांना 'आउटस्टँडिंग काँट्रीब्युशन इन सोशिओ-कल्चरल डेव्हलपमेंट' पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक जबाबदारीच्या जन्मजात भावनेमुळे, या सर्व विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना ह्या पुरस्कारासाठी निवडले गेले होते.
“मला ह्या गोष्टीचा खरंच आनंद होत आहे की माझ्या ह्या कृत्याबद्दल मला एक नवी ओळख मिळाली आणि यासाठी मला २०१९ चा 'नॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड' मिळाल्याबद्दल देखील मी कृतज्ञ आहे. माझा विश्वास आहे की माणसाच्या जन्माची खरी पूर्तता आपण आपल्या समाजासाठी परत कसे योगदान देत आहोत. आणि हीच जाणीव व्यक्ती म्हणून आपल्याला परिभाषित करत असते. माझा असा विश्वास आहे की मी मनापासून आणि माझ्या सर्व प्रयत्नांनी त्या विश्वासाचे अनुसरण करते - मग ते चित्रपट निर्माती असो, मीडिया स्रेटरजिस्ट, ऍनिमल ऍक्टिविस्ट आणि पत्रकार किंवा टेडएक्स स्पीकर असो! हे माझ्या जीवनाचे मुख्य उद्दीष्ट आहे आणि यासाठी पुरस्कार मिळाला ह्यासाठी ह्याचा मला आनंद आहे." ,अनुशा श्रीनिवासन अय्यर आपला आनंद व्यक्त करत म्हणाल्या.
No comments:
Post a Comment