भारतीय हॅन्डलूम उद्योगाला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि पैठणी विणण्याची स्त्रियांची कुशल कारागीरी टिकवून ठेवण्यासाठी श्रद्धा सावंत आणि त्यांची संस्था 'मस्सकली' यांनी मुंबईतील प्रदर्शनात ५०० हून अधिक हॅन्डलूम साड्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. प्रसंगी अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेत्री भाग्यश्री, शर्मिला ठाकरे यांच्या समवेत अनेक हॅन्डलूम चाहते उपस्थित होते. तसेच सोशल मीडिया साडी इंफुलेन्सर ममता शर्मा दास उर्फ बोहोबालिका समवेत अन्य ख्यातनाम व्यक्तींनी देखील येथे उपस्थिती दर्शवली. या सर्वांना, विणकार आणि त्यांच्या कुटूंबियांशी मिसळलेले पाहून तेथील वातावरण खरोखरचं आनंददायी झाले होते. ह्या कार्यक्रमास त्यानी मस्सकलीच्या निवडक अश्या साड्या परिधान केल्या तेव्हा त्यांच्या ह्रदयामध्ये विणकामगिरीचे स्थान किती विशेष आहे हे कळते.
श्रद्धा सावंत यांनी त्यांच्या पैठणीतील दोन विणकरांना प्रोत्साहन देत त्यांच्या विणण्याची प्रक्रिया जाणून घेण्याची संधी पाहुण्यांना मिळावी यासाठी संपूर्ण विणण्याचे वातावरण पुन्हा तयार केले होते. पैठणी साड्यां व्यतिरिक्त बनारसी, चंदेरी, खादी-जमदानी, इकत, झरी, कांजीवरम आणि गढवाल यांसारख्या अनेक हैंडलूम साड्यांचा यात समावेश होता.
आपल्या संस्थेबद्दल बोलताना श्रद्धा सावंत म्हणतात की, "मस्सकली म्हणजे स्वातंत्र्य, शांतता आणि समृद्धीत झेप घेणारा पक्षी - आणि असच काही मी माझ्या विणकर समाजासाठी कलाकारासाठी अपेक्षा करते. त्यांनी ही ह्या पक्ष्याप्रमाणे उंचच उंच झेप घ्यावी." विणकाम करणाऱ्या समाजाची परिस्थिती किती कठीण आहे यावर भर देताना त्या सांगतात की, “विणकलाकर कमालीचे प्रतिभावान आहेत पण परिस्थितीशी झुंझत आहेत,ह्या सर्वांचा खरेदीदारांशी संपर्क तुटक आहे. ह्या कलाकार महिलांच्या कलेस आमच्याकडून चांगला मोबदला मिळण्यास पात्र आहेत आणि जुन्या विणण्याच्या परंपरागत प्रक्रियेस जिवंत ठेवण्यासाठी त्यांना सक्षम ठेवण्यासाठी योग्य ते प्रयत्न झालेच पाहिजे. 'मस्सकली' त्यांनी निवडलेल्या व्यवसायात त्यांना सुखी आयुष्य जगण्यास मदत व्हावी ह्याच प्रयत्नात आहे.”
ही पारंपरिक विणकाम कला लुप्त होण्याआधी या कलेत नवीन आर्थिक लाट निर्माण व्हावी ही इच्छा व्यक्त करीत श्रद्धा सावंत पुढे म्हणतात की, “आपल्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी ग्रामीण रोजगार पुरवण्यासाठी हॅन्डलूम उद्योग एक प्रमुख उद्योग आहे. 'मस्सकली'च्या माध्यमातून मी दंडात्मक स्थितीत असलेल्या परंपराधारकांनाह्या कलाकारांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करीत आहे, तसेच भारताच्या गौरवशाली सांस्कृतिक वारसाचे प्रतीक असलेल्या विणकाम कलेला पुन्हा एकदा रुळावर परत आणण्याचा प्रयत्न आहे."
श्रद्धा सावंत, पारंपारिक विणलेल्या साड्या व्यतिरिक्त खास डिझायनर साड्या कशा तयार कराव्यात ह्याचे प्रशिक्षण देखील देतात. ह्या बद्दल सांगताना त्या हसत म्हणलया, “किमान महिन्यातून एकदा आम्ही वैयक्तिकरित्या छोट्या खेड्यांना भेट देऊन विणकरांशी संवाद साधतो. आम्ही त्यांना नवीन डिझाइन्स बद्दल कल्पना देखील देतो. ह्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळते नवीन काही करण्याची प्रेरणा मिळते. जेव्हा आपण भारतीय कारागीरांचा सन्मान जपतो तेव्हा आपण स्वतःला मदत करतो. हातमाग केवळ पर्यावरणास अनुकूल नाही; पुनरुज्जीवन ग्रामीण स्थलांतर कमी करते."
प्रख्यात अभिनेत्री शबाना आजमी त्याचे हॅन्डलूम साठी असलेले तीव्र प्रेम व्यक्त करत म्हणतात की, " हॅन्डलूम साठी माझे प्रेम बालपणापासूनच उपजत आहे. आणि माझी आई हि हॅन्डलूम ची संरक्षक होती . मी श्याम बेनेगल यांच्या 'सुस्मान' या बंगाली चित्रपटामध्ये एका विणकाराच्या पत्नीची भूमिका निभावली होती. त्यावेळी मला या व्यापारातील महिलांची स्थितज कळली आणि पटली होती. महिला विणकरांना सामील करून या प्रक्रियेत सक्षम बनवल्याबद्दल मी श्रद्धाचे मनापासून कौतुक करते.”
आपल्या चिरतरुण सौंदर्यसाठी प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री ने तिचे पैठणी बद्दलचे प्रेम व्यक्त करत सांगते की, " माझ्याकडे पैठणी साड्या भरपूर आहेत ज्या माझ्या आईने परिधान केल्या आहेत आणि मला आशा आहे की माझी मुलगी त्या परिधान करेल आणि तिचीही मुलगी एक दिवस अगदी साध्या कारणासाठी त्या परिधान करेल - कारण त्या आश्चर्यकारकपणे सुंदर आहेत! ”
त्यांनी एक अतिशय चांगला मुद्दा येथे मांडला जेव्हा त्या म्हणाल्या, “ह्याप्रकाराच्या सुंदर साड्या दागिन्यांसारख्याच अमूल्य आहेत. ह्या कारणास्तव असे म्हणायला हरकत नाही की अश्या साड्या आपल्या प्रत्येक पिढीला वारसा म्हणून भेट हे पण योग्य ठरेल. या दोन्ही अभिनेत्रींनी फक्त उत्सव निमित्तच नाही तर ह्यांचा वापर दैनंदिन जीवनात करावा आणि हा विणकरांच्या आयुष्याला नवी गती देणारा असावा यासाठी आवाहन केले.
No comments:
Post a Comment